कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 78 – विजय साहित्य  ✒सासू सून नात द्वाड.. . . !✒ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

सासू सून नातं द्वाड

आपसात चढाओढ

हक्क राखण्या शाबूत

प्रसंगाला होई गोड. . . . !

 

सासू सून नातं द्वाड

विळी भोपळ्याची जोड

सख्य नसताना होई

तू तू में  में  सडेतोड. . . . !

 

सासू सून नातं द्वाड

विचारांची तोडफोड

स्वार्थासाठी होत असे

रागलोभ धरसोड. . . . !

 

सासू सून नातं द्वाड

कुरघोडी बिनतोड

नाही आजार तरीही

डोस औषधांचा गोड. . . !

 

सासू सून नातं द्वाड

वादातीत डोकीफोड

जुन्या नव्या बदलात

रोज नवी चिरफाड. . . . !

 

सासू सून नात द्वाड

जशी लोणच्याची फोड

जसे मुरते तसे रे

होई संसार तो गोड. . . . !

 

सासू सून नात द्वाड

जसे बाभळीचे झाड

काट्याकाट्यात फुलते

सुखी संसाराचे बाड. . . . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments