कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 92 – विजय साहित्य ?

☆ ? आरती ?  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(स्वरचित  आरती. निर्मिती  विजया दशमी 18/10/2018.)

आरती सप्रेम जय जय जय अंबे माता

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||धृ||

सदा पाठिशी रहा उभी मुकांबिका होऊनी

शिवशक्तीचे प्रतिक तू सिंहारूढ स्वामींनी

कोल्लर गावी महिमा गाई  भक्त वर्ग मोठा .

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||1||

ब्राम्ही रूप हे तुझेच माते चतुर्मुखी ज्ञानी

सप्तमातृका प्रातः गायत्री हंसारूढ मानी

सृजनदेवता ब्रम्हारूपी रक्तवर्णी कांता

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||2||

माहेश्वरी रूप शिवाचे , व्याघ्रचर्म धारीणी

जटामुकूट  शिरी शोभतो तू सायं गायत्री

त्रिशूल डमरू त्रिनेत्र धारी तू वृषारूढा.

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||3||

स्कंदशक्ती तू कौमारी तू नागराज धारीणी

मोर कोंबडा हाती भाला तू जगदोद्धारीणी.

अंधकासूरा शासन करण्या आली मातृका

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||4||

विष्णू स्वरूपी वैष्णवी तू ,शंख, चक्र, धारीणी

माध्यान्ह गायत्री माता तू शोभे गरूडासनी.

मनमोहिनी पद्मधारीणी तू समृद्धी दाता.

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||5||

नारसिंही भद्रकाली तू,पानपात्र धारीणी

गंडभेरूडा , शरभेश्वर शिवशक्ती राज्ञी

लिंबमाळेचा साज लेवूनी शोभे अग्नीशिखा.

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||6||

आदिमाया,आदिशक्ती,विराट रूप धारीणी

रण चंडिका शैलजा  महिषासूर मर्दिनी

महारात्री त्या दिव्य मोहिनी ,शोभे जगदंबा .

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||7||

सप्तमातृका रूपात नटली देवी कल्याणी

भगवती तू, माय रेणुका  शोभे नारायणी

स्तुती सुमनांनी आरती  कविराजे सांगता

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||8||

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments