कविराज विजय यशवंत सातपुते
साप्ताहिक स्तम्भ # 102 – विजय साहित्य
☆ घरकुल ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
रंगत संगत पायाभरणी,सजले घरकुल छान
अंतरात या तुला शारदे ,देऊ पहिला मान
अनुभव आणि अनुभूतीचा , सडा शिंपला परसात
व्यासंगाची सडा रांगोळी, हळव्या काळीज दारात
भाव फुलांची पखरण आणि, देऊ अक्षर वाण …!
किलबिल डोळे नवकवितेचे, कथा छानशी स्वागता
ललित लेख हा दिवाण खाणी, आवड सारी नेणता
पाहुणचारा चारोळ्या, किस्से, शायरी अक्षरांचे दान ..!
पै पाहुणा आला गेला,बघ रंग रंगोटी जोरात
घर शब्दांचे,नांदत आहे, आयुष्याच्या सदनात
कलागुणांना काव्यकलेला सृजनाचे वरदान…!
घरकुल माझे साहित्याचे, अवीट नाते जडलेले
राग लोभ नी क्षमायाचना, आनंदाने भरलेले
कादंबरी चे रूप देखणे, या सदनाची शान …!
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈