कविराज विजय यशवंत सातपुते
साप्ताहिक स्तम्भ # 108 – विजय साहित्य
☆ प्रश्न….! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
साक्षर आहेस..
उच्च विद्याविभुषित आहेस..
विद्या वाचस्पती आहेस…
मग मला सांग..
हा सारा व्यासंग
जोपासताना..
दूर विदेशी जाऊन
कीर्तीवंत,
ज्ञानवंत आणि
यशवंत होताना
तुझ्या..
माय बापाचा चेहरा
तू कितीदा वाचलास..?
कितीदा वाचलेस प्रश्न
माय बापाच्या डोळ्यातले
नी कितीदा दिलीस उत्तरे
तुला जीवनाच्या परीक्षेत
अनुत्तीर्ण करणारी….!
ते जाऊ दे..
तुझा मुलगा सध्या…
काय वाचतो रे…?
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈