कविराज विजय यशवंत सातपुते
साप्ताहिक स्तम्भ # 111 – विजय साहित्य
☆ ?? हा तिरंगा ?? ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
भारतीयांचा राष्ट्रध्वज हा झळके गगनी तेजपताका
हा तिरंगा, मानचिन्ह हे त्रिगुणी याची रंग शलाका.
वरी केसरी, मधे पांढरा गडद हिरवा तळजागी
हा तिरंगा, गंध आडवे भारतभूच्या शिरभागी .
तिरंग्याची लांबी, रुंदी, ठेवा ध्यानी प्रमाण तीचे ठरलेले
प्रमाणबद्ध हा एक तिरंगा, तीनास दोन हे ठसलेले . . !
सारनाथचेअशोक चक्र ते श्वेत विभागी आहे झळकत
निळसर रंगी चोवीस आर्र्या ,हा तिरंगा, आहे मिरवत. . . !
हा तिरंगा, मानचिन्ह हे लोकशाहीचे वस्त्र महान.
कधी न मळला,विटला, उडला ,रंग तिहेरी, राजस छान.
याच्या साठी जन्मा आले, याच्या साठी ते बलिदान
देश आमुचा भारतीयांचा, राष्ट्रध्वज हा अमुची शान….!
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈