कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 124 – विजय साहित्य
☆ देणार प्राण नाही…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(वृत्त आनंद – गागालगा लगागा)
सरणात जाळ नाही
मरण्यात शान नाही.
आरोग्य स्वच्छता ही
करणार घाण नाही.
वैश्विक हा करोना
ठरणार काळ नाही.
संसर्ग शाप झाला
अंगात त्राण नाही .
साधाच हा विषाणू
नाशास बाण नाही .
सोपे नसेल जगणे
हरण्यात मान नाही .
बकरा नव्हे बळीचा
देणार प्राण नाही .
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈