मराठी साहित्य – कविता – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ बापू ☆ श्री सुजित कदम
ई-अभिव्यक्ति -गांधी स्मृति विशेषांक-1
श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं। मैं श्री सुजितजी की प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं । इस अवसर पर श्री कदम जी की इस कविता के लिए हार्दिक आभार. )
☆ बापू ☆
तुमच्या स्वप्नातला देश बापू
खूप खूप लांब राहिलाय.
तुमच्या स्वप्नातला भारत आता
*खळ्ळ खट्याक* झालाय.
तुमची अहिंसेची तत्व आता
कुणी सुद्धा पाळत नाय.
तुम्ही सुद्धा बापू
असं राजकारण करायला हवं होतं
स्वतःपुरते स्वातंत्र्य ठेवून
बाकीच्यांना गुलाम म्हणूनच
राहू द्यायला हवं होतं.
बापू, तुमची किंमत हल्ली
आता पैशामध्येच होते.
मोठा छोटा गांधी म्हणून
ओळख तुमची होते.
तुमची अशी अवहेलना
खरच आता पहावत न्हाय.
काय सांगू बापू
तुमच्या नावाचे कागदी घोडे हल्ली
लाॅकरमध्येही मावत नाय.
तुमच्या फोटोच्या
भ्रष्टाचाराच्या इथे नको इतक्या पावत्या आहेत
तरीही त्याच्या सभ्यतेचे पेपरमध्ये
भले मोठे थाट आहेत.
बापू, शेतातला शेतकरी आता
फासावरती दिसू लागलाय
उपोषणाने कित्येकांचा
रोजचा बळी जाऊ लागलाय.
बापू तुमच्या स्वप्नातला देश
खूप खूप बदललाय.
माणसा माणसातला जातीयवाद
आता नको इतका पेटलाय.
आणखी बरच काही बापू
तुमच्याशी बोलायचं राहून गेलं
*मोहनदास करमचंद गांधी*
इतकच नाव काळजात राहून गेलं. . . !
© सुजित कदम, पुणे
मो.7276282626