* तिरंगी झेंडा *
काव्यप्रकार : हायकू
तिरंगी झेंडा
उभारला नभांत
गर्व मनांत १
देशाचा झेंडा
जेव्हा रोवला माती
स्फुरली छाती २
पराभवांनी
नाही कधी थकला
फडफडला ३
गाजला सदा
रंग महानतेचा
पवित्रतेचा ४
वंदितो तुला
स्पर्शाविना ह्रद्ह्यात
क्षणांक्षणांत ५
© स्वप्ना अमृतकर (पुणे)