श्री शुभम अनंत पत्की
जीवन परिचय
- स्थापत्य अभियंता.
- युवा पिढी चा कवी.
- काव्य आणि अभिनय याची आवड.
☆ कवितेचा उत्सव ☆ नका येऊ बांधावर ☆ श्री शुभम अनंत पत्की ☆
नाही मिळाला कसला न्याय,
नुसते झाले सरकारी दौरे
पाहणी करून उपयोग काय,
इथं उपाशी बसलेत मोहरे
मागं पळून तुमच्या जोरात,
दुखु लागले हताश पाय
कुजलेलं पिक दाखवून तरी,
पाहिलं मदत मिळेल काय
इथं सोन्याला येई झळाळी,
शेअर मार्केटला उसळी
पण शब्द घुमतो महगाई,
जेव्हा फुलते माती काळी
परत नका येऊ बांधावर,
राहुदे आम्हाला जरा शांत
तुम्ही फक्त भेटा चॅनेलवर,
आता अर्णब आधी सुशांत
© श्री शुभम अनंत पत्की
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈