श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 118 – क्षणिका ☆
☆☆ विठ्ठल – पांडुरंग ☆☆
कुणी विठ्ठल म्हणा
कुणी म्हणा पांडुरंग ..
माझ्या सावळ्या हरीला
शोभे सावळाच रंग..!
☆☆ आई.. ☆☆
आई.., इतके लिहावे वाटते तुझ्यावर
की देवाचाही जीव व्हावा खालीवर…!
☆☆ पाखरांचे घर ☆☆
केवढे हे ऊन आहे तापलेले
साउली चे झाड आहे तोडलेले…!
पाडले हे घर कुणी रे पाखरांचे
केवढे हे पाप माथी लागलेले…!
☆☆☆☆
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈