☆ कवितेचा उत्सव ☆ वेदना ☆ श्री शरद दिवेकर☆
नेहमीच तुझं वागणं गूढ असायचं,
तुला कुणालाच काहीच सांगायचं नसायचं.
तू स्वतःला बदल असं सांगून,
काळही गेला बराच पुढे निघून.
आज एवढी वर्षे होऊन गेली,
तुझी झुरत रहाण्याची सवय नाहीच गेली.
तुला आज बोलतं करायला गेलो
आणि तुझे पुर्वीचेच रूप पाहून स्तंभितच झालो.
तुझे एकच सांगणे होते,
वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.
वाट बघतो आहे वेदना संपण्याची,
डोळ्यांना ओढ आहे महाकाव्य वाचण्याची.
© श्री शरद दिवेकर
कल्याण
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈