श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ अबोलिची फुले… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
अबोलिची फुले तुझ्यासाठी वेचताना
गोळा होतात सा-या आठवणी.
आठवतात ते क्षण
संध्याकाळचे,बागेमधले,
तुडवलेल्या पायवाटा,
कुरवाळलेली रानफुले,
बोलण्यापेक्षा न बोलण्यात
घालवलेले तास न् तास
सहवासातली मूक भाषा
स्पर्शाच्या लिपीने लिहीलेली
आज जरा जास्तच हळवेपणानं
आठवतय हे सारं
तुझ्यासाठी फुलं वेचताना.
आपलं गुपीत फक्त
फुलांनाच तर ठाऊक होतं
म्हणून तर नसेल?
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈