श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 150
☆ विखारी आग… ☆
प्राक्तनाने जाळली ही बाग आता
कोणता काढेल साबण डाग आता
वारुळाचे पूर्ण होता काम सारे
फस्त करती मुंगळ्यांना नाग आता
घर्षणाने पेटलेले रान आहे
विझत नाही ही विखारी आग आता
भावकीच्या भांडणाचा लाभ त्यांना
तू शहाण्या सारखा रे वाग आता
भिस्त ज्यावर ठेवली होती इथे मी
तोच गेला मारुनी मज टांग आता
पबमध्ये मी रात्र सारी जागतो रे
कोंबड्या तू दे दुपारी बांग आता
वार हा पाठीत केला आज त्यांनी
काढतो मी लेखणीतुन राग आता
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈