श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ मागणे हे एक देवा 🌺☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

विठ्ठल तू, माउली विठू तू,

तू पंढरिचा राजा, ॥

माय-बाप, कानडा, सखा तू

ये भक्तांच्या काजा, ॥

 

दामाजीचा महार तू,

तू एक्याचा पाणक्या ॥

बहिणाई आणखी जनीचा

जिवलग तू, तू सखा ॥

 

अभंग गाथा रूप तुझे अन्

ओवी चित्र तुझे ॥

कांद-मुळा-भाजीत घातले

रंग आगळे तुझे  ॥

 

सुईस जोडी दोर दिला तू

मडक्यासी आकार

दिधली पिवळी चमक सुवर्णा

उष्ट्याला जोहार ॥

 

भक्तिरसाचा मळा बहरला

ये भक्तीला बहर ॥

चंद्रभागेच्या वाळवंटि ये

भक्तिनदीला पूर ॥

 

वारस सारे अम्ही अज्ञजन

संतसज्जनांचे ॥

विठुराया वरदान अम्हा दे

कृपाकटाक्षाचे ॥

🌺

© सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments