सौ. विद्या पराडकर
कवितेचा उत्सव
☆ मनमयुरा… ☆ सौ. विद्या पराडकर ☆
मनमयुरा तू नाचूनी घे
श्रावणातल्या जलधारानी
देहपिसारा भिजवूनी घे
मनमयुरा तू नाचूनी घे
शितल ओला सुगंध हर्षित स्पर्श तो
वृक्ष लतांना बहर आणि जो
आनंदाने होऊनी बेहोश
चरचरा तू पाहून घे
मेघ गर्जना होता अंबरी
दामिनी येई पळत भूवरी
तेजस्वी पण क्षणभर त्या
ज्योतीला तू पाहूनी घे
गंधयुक्त या वातावरणी
समरसतेच्या विशाल अंगणी
जलाशयाच्या दर्पणातूनी
प्रतिबिंब अपुले पाहूनी घे
देवदूत तू जीवनाधार
मानवाचा आधार
प्रसन्नतेचे मळे पिकवूनी
दे प्राशाया अमृत संजीवनी
मनमयुरा तू नाचुनी घे
श्रावणातल्या जलधारानी
देह पिसाराभिजवून घे
मनमयुरा तू नाचुनी घे.
© सौ. विद्या पराडकर
पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈