कवितेचा उत्सव
☆ रक्षाबंधन… ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆
*
प्रेमळ, सद्गुणी माझे गं भाऊ
नेत्रनिरांजने त्यांचं औक्षण करू
*
जगन्मित्र, उद्योगी, अन् कार्यतत्पर
उभे सदा राहती पाठिशी खंबीर
*
आपापल्या क्षेत्रात भारी निपुण
छंदात लाभो त्यांना नवं संजीवन
*
निरामय आरोग्य दीर्घायुष्य लाभावे.
बहिणींना भावांचे प्रेम उदंड मिळावे …
*
© सौ. मुग्धा कानिटकर
सांगली
फोन 9403726078
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈