स्व. बा. भ. बोरकर
☆ कवितेचा उत्सव ☆ “संधीप्रकाशात” ☆ स्व. बा. भ. बोरकर ☆
(संधीप्रकाशात या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये सौ अमृता देशपांडे यांनी केले आहे.)
संधीप्रकाशात अजुन जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना
तेव्हा सखे आण तुळशीचे पान
तुझ्याघरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्या सवे दे पाणी
थोर ना त्याहुनि तीर्थ दुजे
रंभागर्भी वीज सुवर्णाची कांडी
तशी तुझी मांडी मज देई
वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल
भुलीतली भूल शेवटली
जमल्या नेत्रांचे फिटू दे पारणे
सर्व संतर्पणे त्यात आली
कवी: बा. भ. बोरकर
या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.
सौ अमृता देशपांडे
पर्वरी, गोवा.
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈