कवी राज शास्त्री
(कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी) मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं। विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है। ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “ अभंग …”)
☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 11 ☆
☆ अभंग… ☆
केशव माधव,
अनंत अगाध,
झालो मी सावध, परमेशा…०१
महाराष्ट्र माझा,
संतांची ही भूमी
माझी कर्मभूमी, हीच झाली…०२
देव अवतार,
इथेच जाहले
संतांनी पूजिले, ईश्वर ते…०३
सात्विक आचार,
सुंदर विचार
महाराष्ट्र घर, माझे झाले…०४
संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम
जीवन निष्काम, संतांचे हे…०५
शौर्याची पताका,
इथे फडकली
तोफ कडाडली, गडावर…०६
शिवबा जन्मला,
शिवबा घडला
माता जिजाऊला, आनंद तो…०७
मराठी स्वराज्य,
शिवबा स्थापिले
मोगल पडले, धारातीर्थी…०८
ऐसा माझा राजा,
छत्रपती झाला
निर्भेळ तो केला, कारभार…०९
दगडांच्या देशा,
प्रणाम करतो
अखंड स्मरतो, बलिदान…१०
कुणी आक्रमण,
तुझ्यावर केले
हल्ले किती झाले, पृथ्वीवर…११
चिरायू हा होवो,
कण कण तुझा
नमस्कार माझा, स्वीकारावा…१२
कवी राज म्हणे,
निसर्ग सौंदर्य
आणि हे औदार्य, कैसे वर्णू…१३
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन,
वर्धा रोड नागपूर,(440005)
मोबाईल ~9405403117, ~8390345500
सुस्वागतम् आणि अभिनंदन