श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
पुढल्या वर्षी…!
श्री प्रमोद वामन वर्तक
(नमस्कार मंडळी !🙏 गणपतीला गावाला गेलेले चाकरमानी मुंबईला परतल्यावर, गावच्या घरात कायम राहणाऱ्या माऊलीच्या मनातील विचार खालील रचनेत मांडायचा प्रयत्न केला आहे !)
दहा दिसांचा सोहळा
उद्या संपन्न होणार,
वाजत गाजत आले बाप्पा
वाजत गाजत जाणार !
वेळ होता आरतीची
कानी घुमेल झांजेचा नाद,
गोडधोड प्रसादाचा मिळे
पुन्हा पुढल्यावर्षी स्वाद !
जातील परत चाकरमानी
घरी आपल्या मुंबईला,
येतील पुढल्या वर्षी लवकर
सारे बाप्पाच्या तयारीला !
घर मोठे गजबजलेले
आता शांत शांत होईल,
सवय होण्या शांततेची
वेळ बराच बघा जाईल !
होता उद्या श्रींचे विसर्जन,
रया जाईल सुंदर मखराची,
पण घर करून राहील मनी
मूर्ती मखरातल्या गणेशाची !
© श्री प्रमोद वामन वर्तक
०८-०९-२०२२
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈