श्री मुबारक बाबू उमराणी
☆ कवितेचा उत्सव : नवे गीत ☆ श्री मुबारक उमराणी ☆
रात्र बोले
माझ्या सवे
चांदण्याचे
पक्षी थवे
किर् किर्
आलापात
काजव्याची
दीप वात
चांदण्याचे
उल्कापात
ज्योतरेषा
ओढी रात
वारा होई
हळू थंड
रातराणी
करी बंड
पावसाचे
चार थेंब
पान पान
भिजे चिंब
घरट्यात
पक्षी मिठी
बेडकांची
वाजे शिटी
शुक्र तारा
बोले काही
रान फुल
सारे पाही
येतो सूर्य
रात्र पित
पक्षी बोले
नवे गीत
© श्री मुबारक बाबू उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुंदर गीत