महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 98
☆ सांगना केव्हा येणार तू… ☆
आठवतात दिवस
आजही मला ते
ओल्या वाळूतले
खेळण्याचे ते…
तुझा लटका राग
आजही आठवतो
तुझा तो अबोला
मी मनात साठवतो
असा हा तुझा ध्यास
माझ्या रोम रोमात
तुझ्या-विना मी,
असतो फक्त शून्यात…
तुझे प्रेमळ बोलणे
स्मरणात आहे मला
सांग तू आहेस कुठे
कसा शोधू गं तुला…
अंगणातल्या जागी
आजही पारिजात उभा
विचारतो सतत मला
कुठे आहे तुझी प्रभा…
त्यास मी काय सांगू,
न कळलेच तेव्हा
प्रिये सोडणं अबोला,
सांगणं तू येणार केव्हा…
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈