कवितेचा उत्सव
ज्ञानेशांचे ध्यान
श्री.संत गुलाबराव महाराज
सुंदर ते ध्यान इंद्रायणीतीरी
सावळी गोजिरी मूर्ती मध्ये॥
पांडुरंगकर तयाचे आसन
सामोरे निधान निवृत्तिराज॥
सोपानमुक्ताबाई शोभती आणिक
नारदादि लोक पूजिताती॥
हृदयीचे गुह्य उमटले आता
अंतर्बाह्य चित्ता समभाव ॥
ज्ञानेश्वर तात आणि कृष्ण पति
सौभाग्यसंपत्ति नित्य मज ॥
संत गुलाबराव महाराज.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈