श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 122 – बाळ गीत – कडाक्याची थंडी ☆
थंडी पडली कडाक्याची
हुडहुडी भरली कायमची।।धृ।।
आलारामचा बाई नसता धाक।
सर्दीने लालेलाल झाले नाक।
संधी नामी शाळा बुडवायची ।।१।।
सुंठ मिर्याचा गरम गरम चहा।
गोडगोड शिर्याची चव वाहा!
आईला चुकवून खेळायची।।२।
छानछान स्वेटर टोपी मऊ।
बाबाही सारखेच आणती खाऊ।
आजीही छान छान थोपटायची।।३।।
शेकोटी शेकण्याची मजाच भारी।
अणंात जमून शेकतात सारी।
खूप खूप धमाल करायाची।।४।।
दादाला मुळीच नाही हो अक्कल।
गोळ्या खान्याची लढवली शक्कल।
सारी मजाच घालवली थंडीची।।५।। ं
ताई म्हणाली दवाखान्यात जाऊ।
डॉक्टर कडून तपासून घेऊ।
वाटच पकडली मी शाळेची ।।६।।
नकोच शाळा बुडवायची….।
हूडहुडी भरली कायमची,…..।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈