सौ. विद्या पराडकर
कवितेचा उत्सव
☆ हिरवा रंग… ☆ सौ. विद्या पराडकर ☆
नवरंगात असुनही रंग माझा खास आहे
हरहुन्नरी गडी मी वेगळाच माझा वास आहे
मी हिरवा रंग आहे
जगदंबा माझ्यात दंग आहे
मी नवरात्रीची पाचवी माळ आहे
माझ्यावर बुध ग्रहाची सावली आहे
त्रिभुवनसुंदरीने हिरवा शालू परिधान केला आहे
पावित्र्य व मांगल्य यांचे रंग त्यात भरले आहे
हरितक्रांतीचा मी आत्मा आहे
शेतकऱ्यांचे संजीवन आहे
मी नववधूचा हिरवा चुडा आहे
सुवासिनींचे नवचैतन्य आहे
तिरंग्याची मी शान आहे
राष्ट्रभक्तीची मी मान आहे
बहरलेल्या सृष्टीचा मी प्राण आहे
चैतन्याचे पान आहे , सजीवाचे लक्षण आहे
माझी एक अंतरी आस आहे
एकतेच सर्व रंगांचा वास आहे .
© सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे..
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈