श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 129 – काळोख…! ☆ श्री सुजित कदम ☆
काल पर्यंत
अंधाराला
घाबरणारी
माझी माय
आज
माझ्या
डोळ्यांच्या आत
मिट्ट काळोखात
जाऊन बसलीय…!
पुन्हा कधीही
उजेडात
न येण्यासाठी…!
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈