डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ वय एक आकडा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

सरले किती, मोजू नको,

     उरलंय अजून बरंच काही

सरलेल्या गोड आठवणींनी,

      उरलेलं गोड करुन घे काही

 

कौमार्य गेलं असेल शिक्षणात,

      अन् भाव-भावंड सांभाळण्यात..!

तारुण्य गेलं नोकरी व्यवसायात

      स्वतःला कुटुंबाला उभं करण्यात!

 

वय केवळ एक आकडा समज ,

      मन भरुन जगून घे..!

“लोक काय म्हणतील?”सोडून,

      मनाला थोडी मोकळीक दे !

 

तू शिक्षित वा अशिक्षित स्वतःसाठी

       संवेदनाशील होऊन बघ..!

स्वतःशीचा वाद संपवून,

   उर्वरीत नियोजन करुन बघ..!

 

व्रण कधीच आठवू नकोस,

     भरलेल्या त्या जखमांचे!

दिवस कधीच साठवू नकोस,

      संकटांच्या त्या क्षणांचे ।

 

हुंदका ही नकोच नको,

     सुर्य मावळतीच्या या क्षणी

तो किती तेजस्वी दिसतो,

    हेच असू दे तुझ्या मनी..।

 

काम, क्रोध,लोभ सारे,

   निवळून जातील कुठेतरी !

निरव मनाची शांतता,

   दाटून येईल तुझ्या अंतरी ।

 

कोण जाणे पुढचा जन्म,

    पशुपक्षी वा माणूस खरा

याच जन्माचा करु सोहळा,

       माणूसकीचा ध्यास बरा ।

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Sangita Bhandare

खूपच छान 👌🏻👌🏻