सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ खरं सांग ना🍃 सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
अरे माझिया मना
तू खरं सांग ना
गुंतलासी असा कुठे
कानी बोल ना
स्पर्श तो धुंद अधिर
चांदणेही भावमधुर
शब्दाविना संवादची
नी अंतरात झंकार
काय असे जाहले
अंगांगची मोहरले
भेटीची ओढ मनी
क्षण क्षण गंधाळले
दुर्मिळसा भाग्याने
क्षण असा लाभतो
स्वप्नातील वाटेने
चांदण्यात नेतो
भारलेल्या क्षणाने
वेड असे लावले
फिरूनी त्या वाटेवरी
ओढाळ मन थांबले
परिस स्पर्श लाभला
अंगांगी सुवर्ण झळा
मोरपिशी स्पर्शाचा
लागतो कसा लळा
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈