कवी राज शास्त्री
☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 23 ☆
☆ सरी वर सरी… ☆
(अंत्य-ओळ काव्य)
उन्हाळा हिवाळा पावसाळा
अनमोल दातृत्व निसर्गाचे
उन्हाळा संपता संपता
आगमन ते पर्जन्याचे…०१
आगमन ते पर्जन्याचे
सरी सर सर येती
सरी वर सर पडतांना
तुषार पाण्याचे उडती…०२
तुषार पाण्याचे उडती
इंद्रधनू सुरेख खुले
पाठशिवणीचा खेळ
ऊन सावलीचा चाले…०३
ऊन सावलीचा चाले
खेळ हा जन्मोजन्मीचा
निसर्गाच्या करामती
जन्म तोकडा माणसाचा…०४
जन्म तोकडा माणसाचा
क्षणभंगुर आयुमान हे
नावालाच ती शंभर वर्षे
स्वप्न जन्म-जन्मांचे पाहे…०५
© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈