श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 134 ☆ हे श्री गुरु दत्तात्रेया …! ☆ श्री सुजित कदम ☆
हा प्रत्येक श्वास माझा दत्तात्रेय गात आहे
दर्शनास गुरुदत्ता आतुरला जिव आहे…!
हे श्री गुरु दत्तात्रेया तू आहे चराचरात
भक्तास तारावयाला तू येतो कसा क्षणात …!
घेतसे मिटून डोळे मी तुझ्या दर्शनासाठी
चरणी ठेवतो माथा तुलाच पाहण्यासाठी…!
हे श्री गुरु दत्तात्रेया दे दर्शन तू मजला
गाणगापूरी आलो मी दत्ता तुला भेटण्याला…!
दिगंबरा दिगंबरा जयघोष होत आहे
तू दर्शन देता देवा आनंदला जिव आहे…!
दत्तात्रेया कृपा तुझी जन्माचे सार्थक झाले
जाहले दर्शन आणि आयुष्याचे सोने झाले…!
ह्या देहास माझ्या आता सेवा तुझीच घडावी
चरणावरीच तुझिया प्राण ज्योत ही विझावी…!
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈