☆ कवितेचा उत्सव ☆ फक्त एक प्रश्न ☆ आर्कि. ओंकार केशव कुलकर्णी ☆
काठ दाटून आले की, पूर आलाय हे साहजिकच?
डोळ्यातून पाणी येण्या पूर्वीचा क्षण काय सांगत असतो बरं खरचं?
मनाला सांगायचं असतं का खूप काही आणि बरचं?
की ह्रदय नावाचा अवयव ,फक्त हुंदकायचा करतो खर्च?
गलित झालेली गात्रे आखडून घेतात का स्वतः, की बळबळचं?
जाणीवांना भावनांचा ओलावा मिळतो की हे घडते सहजचं?
अजूनही वाटतं शेक्सपिअर जिवंत आहे , जगावं की नये हाच?
जोवर हा प्रश्न जिवंत आहे ,तोवर तो क्षण काय सांगत असतो खरचं?
© आर्कि. ओंकार केशव कुलकर्णी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈