श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 130 – हवा अंत ☆
मनी वाचतो मी तुझा ग्रंथ आता।
जिवाला जिवाची नको खंत आता।
असावी कृपा रे तुझी माय बापा।
नको ही निराशा दयावंत आता।
पताका पहा ही करी घेतली रे।
अहंभाव नाशी उरी संत आता ।
सवे पालखीच्या निघालो दयाळा।
घडो चाकरी ही नवा पंथ आता।
तुला वाहिला मी अहंभाव सारा।
पदी ठाव देई कृपावंत आता।
चिरंजीव भक्ती तुला मागतो मी ।
नको मोह खोटा हवा अंत आता
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈