☆ कवितेचा उत्सव ☆ बालदिन विशेष कविता – सुश्री स्वप्ना अमृतकर ☆
(१४ नोव्हें २०२० भारतीय बाल दिन विशेष निमित्त बालकविता)
आ$$ ऊ$$ आऊच
करता सुरू बालपण
हे$ हे$ ओहो$ आहा$
करी आमचे बालमन, १
धुम$ पिचक धुम$
धिंगाणा हो मस्तीचा
बुम$ चिक चिक बुम$
उनाडपणा बालवर्गाचा, २
हो सापशिडी सारखी
धडपड चढ उताराची
संदूक उघडे रमणबाग
खुल्या दिवास्वप्नांची, ३
चुटकी सरशी सरते
सरसर आमचे बालपण
उपदेश अन् आदेशांचे
नकोच मुळी थोरपण, ४
कारण की,
आ$$ ऊ$$ आऊच
करता सुरू बालपण
हे$ हे$ ओहो$ आहा$
करी आमचे बालमन, ५..
© स्वप्ना अमृतकर , पुणे