श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 133 – तो चंद्र सौख्यदायी ☆
तो चंद्र सौख्यदायी सोडून आज आले।
ते भास चांदण्याचे विसरून आज आले।
प्रेमात रगलेल्ंया माझ्याच मी मनाला
वेड्या परीस येथे तोडून आज आले।
होता अबोल नेत्री होकार दाटलेला।
खंजीर जीवघेणे खुपसून आज आले।
मागू नकोस आता ते प्रेम भाव वेडे।
वेड्या मनास माझ्या जखडून आज आले।
देऊ कशी तुला मी खोटीच आर राजा।
आभास जीवनाचे विसरून आज आले।
जाणीव वेदनांची सांगू कशी कुणाला।
माझ्याच जीवनाला गाढून आज आले
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈