☆ कवितेचा उत्सव ☆ निसर्ग राजा ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆
निसर्ग राजा दैवत आहे,
कृपा करी सदा आम्हावर.
देतो छाया अन् शुद्ध हवा,
तृप्त होती सारे चराचर.
वर्षाराणी देते नवजीवन,
तरु होती पहा हिरवेगार.
पाऊसपाणी आहे म्हणूनी,
मुक्त बागडती ते जलचर.
बळीराजावर आहे कृपादृष्टी,
धनधान्यही मिळे निरंतर.
पशुपक्षीही आनंदे विहरती,
उडती, फिरती ते निशाचर.
फुलपाखरे ही गाणी गाती,
कोकीळ काढतो मंजुळ स्वर.
तो कैवारी अन् तो सांगाती,
कृपाछत्र हे राहे जीवनभर.
© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈