महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 111
☆ अभंग… स्मरा कृष्ण… ☆
श्रेष्ठ सज्जनांचा, संत महंतांचा
आणि आचार्यांचा, मान ठेवा.!!
अहंकार जावा, धर्म आचरावा
गर्व ही नसावा, मनांतरी.!!
सात्विक आहार, सुंदर विचार
हृदयी आदर, नित्य हवा.!!
श्रीकृष्ण प्राप्तीची, उत्कंठा असावी
अप्राप्ती भावावी, श्रीमुर्तीची.!!
कवी राज म्हणे, चालता बोलता
उठता बसता, स्मरा कृष्ण.!!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈