महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 113
☆ तिळगुळ होताना… ☆
तिळगुळ एकत्र येतो
एकत्र येऊन समरस होतो
समरस होऊन एकमेकांत
प्रेमाचा तो संदेश देतो
तीळ तुटतो,गूळ फुटतो
तेव्हाच कुठे गोडवा येतो
आपल्यातील अहंकार असाच तुटावा
गोडवा गोडवा आणि गोडवाच रहावा
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
परंपरेचे भान अन
स्नेह तुषार उडवित जावे
ममता आणि सुनम्रता
साधावी ती समर्पकता
शेवटी काय हो येईल सोबती
म्हणुनी जपावी प्रेमळ नाती
सु-मंगल सु-दिन आज उगवला
तिळगुळ घ्या,गोड गोड बोला
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈