श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 171
☆ प्रेम सिंधू… ☆
मोगऱ्याचा डाव आहे
हा सुगंधी घाव आहे
बेगडी हे हास्य ओठी
आणि खोटा भाव आहे
ठेवले मी प्रेम जेथे
कागदाची नाव आहे
टांगली झाडास प्रीती
पाहणारा गाव आहे
प्रेम कालातीत माझे
शून्य टक्के वाव आहे
प्रेम सिंधू भेटुनीही
लागला ना ठाव आहे
पंख माझे छाटणारा
सागतो मी साव आहे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈