श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 136 – रानफुल झाले मी ☆
रानफुल झाले मी दवात चिंब न्हाले मी।
सुंदर हिरव्या कुरणी भान हरपून गेले मी ।।धृ।।
हा उषेचा रंग न्यारा साद घाली मंदावरा।
भास्कराने भूषविला सोनसरीं हा पिसारा ।
कल्पनेचे पंख मांझे अंबरी या विहीरते मी।।१।।
जीव माझा सानुलासा मुक्तछंदी लहरते मी।
सुगंधाची लाट साऱ्या दशदिशांना उधळते मी।
अंतरीच्या मकरंदाने तव क्षुधा शमविते मी।।३।।
खंत नसे वादळाची नच तमा संकटाची।
भारलेल्या या क्षणांना भ्रांती का रे ती उद्याची ।
दो घडीच्या जीवनी या जन मनांना जोडते मी।।४।।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈