सौ. नेहा लिंबकर
कवितेचा उत्सव
☆ मन विहंग… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆
कधी वाटते मला की फुलपाखरूच व्हावे
फुलाफुलातूनी पराग कण वाचावे.
कधी वाटते मला की स्वच्छंदी पाखरू बनावे
आसमंत सारा विहरूनी विसावे
कधी वाटते मला की काजवाच व्हावे
चमकुनी रात्रीस सार्या प्रकाशमान करावे.
कधी वाटते मला की मनावरी स्वार व्हावे
जग पिंजुनीया सारे, क्षणात परतून यावे
कधी वाटते मला की नवल एक व्हावे
जग सारे स्वच्छ नि निर्मळ बनावे.
कधी वाटते मला की माझ्यात मी विसावे
माझेच अंतरंग आरशापरी दिसावे
वाटणे हे सारे, स्वप्न परि नसावे
शब्दात उतरूनी सत्य-सत्य व्हावे.
© सौ. नेहा लिंबकर
पुणे
मो – 9422305178
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈