सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ जागर स्त्रीशक्तीचा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
आठवांचा पिंगा बाई
माझिया तनामनात
तुझ्या अनंत रुपांची
सजे आरास मनात
माता तू मायासागर
लेक तुची गं हसरी
प्रेम सरिता पद्मिनी
भार्या होसी गं सुंदरी
कधी वज्रापरी तर
कधी कुसुम कोमला
अशी कर्तव्य तत्परा
झळाळती तू चपला
त्रिखंडात तुझी कीर्ती
घेसी गगन भरारी
पराक्रमी तेजयुता
देशासाठी लढणारी
शूरवीर घडविसी
जपतेस गं संस्कृती
नवी पिढी संस्कारित
करतेस सरस्वती
अन्यायाची परिसीमा
सोसलीस एकेकाळी
हिमतीने चाललीस
काटेकुटे पायदळी
सारी क्षेत्रे पादाक्रांत
केली या नारीशक्तीने
शिक्षणाने ज्ञानवंत
जाहलीस गं जिद्दीने
नित करुया आपण
जागर गं स्त्रीशक्तीचा
पूज्य भाव असो मनी
थोर स्त्रीत्व जपण्याचा
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈