प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर
कवितेचा उत्सव
☆ बाई म्हणून… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
किती
सहन करावं लागलंय तिला,
टिकलीचं आाणि बिगर टिकलीचंही
बाई म्हणून.
तिने
उगारलेच समानतेचे हत्यार तर
पुरुषालाही करायला लावेल ती शृंगार
आणि
लावायला लावेल कुंकू टिकली एक दिवस.
पण
अजूनही तिने
पाळलीय सभ्यता
आणि जपलंय
प्रत्येक घराचं घरपण
युगान युगे.
एकीकडे कपाळ पुसायला लावणारे
आणि दूसरीकडे
टिकली लावायला लावणारे
सगळेच
आजूबाजूला
दबा धरून
तिच्या आसपास
ती
बाई म्हणून.
© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर
बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
मो ९४२११२५३५७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈