श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ असं होतं नसतं ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(हिन्दी भावानुवाद ⇒ इसका मतलब ये तो नही…☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆)
रस्ता बंद झाला
म्हणजे रस्ता संपला
….असं होत नसतं
दिव्यातलं तेल संपलं
म्हणजे प्रकाश संपला
….असं होत नसतं
पानं झडून गेली
म्हणजे झाडही वठलं
….असं होत नसतं.
असतो एखादा क्षण काळाकुट्ट
पण तोच करतो मन घट्ट.
पुन्हा उठावं,लढावं आणि जिंकावं
असं वाटणं म्हणजे जगणं
मन खेळतच जाणार नवा खेळ,
क्षणाक्षणाला ;
पण बुद्धीच्या शृंखलांनी आवरावं त्याला,
झेप घ्यावी नव्या उमेदीनं अन्
व्हावं आपणही एक फिनिक्स !
☆
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈