सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ कवितेचा उत्सव ☆ मन-क्षेत्र ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
मनाच्या भूमीची,
भाजावण केली!
जलाच्या विरहात,
कोळपून गेली!
मनाची ही भूमी,
विचारांची पेरणी!
भावनेचे पाणी,
बीज अंकुरे झणी!
मन निर्मळ क्षेत्र,
बी असे निमित्तमात्र!
उगवेल मन चित्र,
वेल अंबरी जाईल!
मना नाही आधार,
राही अस्थिर, बेजार!
मनोवेलीला माझ्या,
फळे येती नाजूक फार!
मनाशी एकरूप,
देह आणि आत्मा!
त्यांच्या ठायी राही,
अक्षय परमात्मा!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈