श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ अनुभूती… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

समझदार मी कवी उद्याचा, हवे कशाला बंधन मजला ?

नकोच कुंपण मज शास्त्रांचे, स्वैर करु द्या कविता मजला |

जगात जे जे दिसते काही, काव्य विखुरले त्याचे ठायी

हृदय वीणेची तार कंपता, सुचेल ते मग लिहू द्या मजला ||

 

निसर्ग उघडी गुहा अनोखी, नितांत मंगल सौंदर्याची

तसेच चेहरे दीन जनांचे, निशि दिनी माझी प्रतिभा फुलवी |

सुख दुःखाचे जग हे वर्तुळ, आम्ही प्रवासी फिरतो त्यातून

अनुभुतीला जे जे येते, त्यातून मजला कविता स्फुरते ||

 

अन्यायाचे भीषण तांडव, वा क्रौर्याचे उघडे नर्तन

शब्दरुप मी करिता तेव्हा, अणू निर्मिते माझी प्रतिमा |

कधी बैसतो मी उद्यानी, गळती पुष्पे वेलीवरुनी

नयन भिजे, मन कंपीत होते, विरह गीत मज त्यातून स्फुरते ||

 

अज्ञानाच्या घन अंधारी, चाचपडे जन मुढ होऊनी

त्या अंधारा छेद देऊनी, कविता माझी ठरते दिवटी |

शास्त्र सागरी खुशाल मंथन, विद्वानांना करु द्या चिंतन

कविता माझी त्यांच्यासाठी, उपेक्षित जे जगता माजी ||

 

समझदार मी कवी उद्याचा, हवे कशाला बंधन मजला ?

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments