महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 128
☆ स्त्री व्यथा… ☆
स्त्री जन्म मिळाला
काय दोष घडला
समाजात आम्हाला
सन्मान का अडला…
लहानपणी खेळ
खूप खूप खेळले
कळी उमलताच
का कुणाला नडले…
वयात येणे आमुचे
का बरे खटकले
देव्हाऱ्यातील देवाला
कोडे असेल पडले…
नेमके कसले परिवर्तन
प्रकार नाही कळला
वयात येणं काय
आईने उपदेश केला…
हळदी कुंकवाला
आम्हाला अडवलं
शहाणं होणं तेव्हा
माज-घरातचं अडकलं…
देवाची असे करणी
नारळात साचे पाणी
आम्ही का असे घडलो
रक्तरंजित झाली न्हाणी…
काय हा समाज पहा
काय असली तऱ्हा
देवाच्या दातृत्वाला
ठेवले कुणी पैऱ्हा…
चार पाच दिस एकटे
जगणे आले वाट्याला
जिथे अवतार देवा-दिकांचा
त्याचा विंटाळ झाला…
मंदिराची कवाडे
बंद केली गेली
ज्ञानी पंडित लोकांनी
आमची, दुर्दशा मांडली…
धार्मिक वेडे धुरंदर
अडाणी मूर्ख झाले
दातृत्व कर्तीला
दूर दूर लोटले…
असा सर्व पसारा
अशी आमची व्यथा
आमच्या ह्या व्यथेला
नका करू कधीच कथा…
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈