सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ कवितेचा उत्सव ☆ मागणे…. ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
मागू का मी आज काही
सांग देवा तुजकडे
मागू की नाहीच मागू
आज पडले साकडे ……
हे हवे परी ते नको
हे नित्यची चालू असे
ऐकतोस की नाही तू
हेही मला ठावे नसे…..
आज एकची मागते
तू लक्ष दे माझ्याकडे
वृत्तीची निवृत्ती होवो
‘मीपणा‘ ने तुजकडे…
एव्हढे देशील तर
मी मागणे विसरेन
तव स्मरणी गुंगता
मी मलाच विसरेन ….
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
प्रतिभा अभिनंदन व शुभेच्छा
व्रुतीची निव्रुती होवो
किती सुंदर मागणे आहे हे !
??