श्री गौतम रामराव कांबळे
कवितेचा उत्सव
☆ वाटते उदास… ☆ श्री गौतम कांबळे ☆
नाती काळजाची
होती का भकास?
तुटताना जीव
वाटते उदास
वेल वंशावळी
डौलाने डोलतो
थोड्याशा चुकीने
मातीमोल होतो
काळ सरताना
भाव बदलतो
नात्यातला अर्थ
अर्थात वाहतो
तुटताना बंध
काळीज फाटते
घालताना टाके
प्रेमही आटते
© श्री गौतम रामराव कांबळे
शामरावनगर,सांगली.
9421222834
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈