कवितेचा उत्सव
☆ मोबाईल ने चोरली माणुसकी… ☆ श्री दत्तात्रय गणपतराव इंगळे ☆
उन्हाळ्याची सुट्टी आता
मोबाईल ने चोरली,
मामाच्या गावाला जायची
मजाच निघून गेली!
मोबाईल ने चोरले
मुलांचे खेळणे,
मैदान ही झाले
आता सुने सुने!
मोबाईल ने चोरली
गोष्टीची पुस्तके,
आज्जी आजोबाही
आता शांत शांत झाले!
मोबाईल ने चोरल्या
गप्पा घरातल्या,
बंद झाले विचार
गोष्टी आपसातल्या!
मोबाईल ने माणसाची
माणुसकी चोरली,
आणि माणुसकी आता
संपत चालली…
माणुसकी आता संपत चालली…
© दत्तात्रय गणपतराव इंगळे
(आलूरकर)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈