महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 134
☆ अभंग – सूर्य ☆
मावळता सूर्य, घाईमध्ये होता
निघालाही होता, स्वस्थानाला. !!
त्याला मी बोललो, थांब ना रे थोडे
बोलणारे गडे, माझ्यासवे. !!
घाईत असता, बोलला तो सूर्य
अरे माझे कार्य, प्रकाशाचे. !!
जरी मी थांबलो, सर्व ही थांबेल
दोष ही लागेलं, माझ्या कार्या. !!
म्हणोनी न थांबणे, कार्य हे करणे
सदैव चालणे, नित्य-कार्या. !!
काल्पनिक भाव, माझा मी मांडला
त्यातून शोधला, गर्भ-अर्थ. !!
कवी राज म्हणे, शब्द अंतरीचे
आहे कल्पनेचे, साधे-शब्द. !!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈