श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 193
☆ नोबेल… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
शांतीसाठी नोबल मिळते
युद्ध तरीही रोजच घडते
☆
रणांगणावर किती मारले
कीर्तिमान तर त्यावर ठरते
☆
शांतम पापम् मुखात तरिही
रक्त आतले सळसळ करते
☆
धर्तीवरचा अकांत पाहुन
बुद्धाचीही मूर्ती रडते
☆
मानवतेचा हात सोडता
नितळ मनावर जळमट धरते
☆
रक्त पाहुनी रक्त गोठता
तमोगुणांचे आसन ढळते
☆
नाही झाली वर्षा तरिही
दवबिंदूने अंगण भिजते
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈